ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- केडगाव येथील अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.9 वीतील अनुज्ञ अभिजित वराडे याने मागील वर्षी इ. 8 वी मध्ये एन एम एम एस परीक्षेत १७१ पैकी १६३ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला व राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत झालेल्या शिषवृत्ती परीक्षेत २९४ पैकी २७२ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक मिळविला. या दोन्हीही यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने अनुज्ञ वराडे या विद्यार्थ्यांस सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल बक्षिस स्वरूपात देण्यात आला. या यशाबद्दल अनुज्ञ वराडे याचे शाळेतील शिक्षक, पालकांनी, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments