Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; 7 महिला अटक ; एलसीबीची कारवाई

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोल्हापूर : महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 7 महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली. या छाप्यादरम्यान पोलिसांनी एकूण 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास केली.
छाप्यात अटक करण्यात आलेल्यां महिलांमध्ये मीना किरण काळे (वय 40 रा. संभाजीनगर), छाया जगनू लोंढे (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (वय 40 रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय 40 रा. केर्ली सध्या टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (वय 35 रा. कोरोची), ज्योती नामदेव पाटील (वय 70 रा. समडोळी मळा जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (वय 45 रा. संभाजीनगर झोपडपट्टी) आदि 7 महिलेसह अर्जुन कल्लाप्पा वसगडे (वय 53 रा. मंगेश्‍वर कॉलनी उचगाव) याचा समावेश आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, इचलकरंजी नजीक जयसिंगपूर येथील संभाजीनगर परिसरात पोलिसांनी 
विशेष म्हणजे जुगार अड्यावर पत्ते खेळणाऱ्या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संबंधित महिलांवर खिसे कापणे, चोरी, यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातही महिलांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत जयसिंगपूर पोलिसांनी देखील सहभाग घेतला.
👉अशी केली कारवाई 
संभाजीनगर येथे एका घरात तीनपानी पत्याचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी सात महिला आणि एक पुरुष तीन पाणी पत्याचा जुगार पैशावर खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपींना जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संबंधित महिलांची अधिक चौकशी केली असता या महिला सराईत पिक-पॉकेटींग आणि स्नँचींग चोरीमधील रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.
ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पो.नि. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केलीPost a Comment

0 Comments