Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सरपंच'पदासाठी 7 वी पास असणे आवश्यक ; अर्ज भरताना अर्जदार 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा असू नयेऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आहे. जाहीर झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुकांनी सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ केला आहे. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किमान सातवी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. या आदेशामुळे इच्छुक कमी शिकलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. 
जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल अथवा त्यास सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा आदेश गुरुवारी जारी झाला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार 21 वर्षांपेक्षा कमी वयाचा असू नये. उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे. उमेदवार जर 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल. ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवले नसेल. त्यासंबंधिताने सातवी उत्तीर्ण असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिले जाणार नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती असल्याने नाहक ससेहोलपट होत आहे.
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने बँकेचे नवीन खातेबूक मागितले असल्याने उमेदवारांना नवीन खाते उघडण्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.
ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. बुधवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस आहे.
मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने केवळ एकच नामांकन अर्ज दाखल झाला आहे. शासनाने लावून दिलेल्या कागदपत्रांच्या जाचक अटीमुळे इच्छुक उमेदवार हतबल झाले आहेत. हे प्रत्यक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीतून दिसून येते.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करावयाच्या कागदपत्रकांसोबत नवीन खाते उघडल्याबाबतचे बॅक खातेपुस्तिकेची स्वंयसाक्षंकीत प्रत मागीतल्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांची ससेहोलपट होत आहे.
बँकांकडून नवीन खाते घ्यायचे झाले तर लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करताना इच्छुक उमेदवारांची दमझाक होत आहे. अद्ययावत केलेले आधारकार्ड, पॅन कार्ड व खाते उघडताना दोन ते पाच हजार रुपये इत्यादींची मागणी बँकाकडून केली जात असल्याने उमेदवार हतबल झाले आहेत.
नवीन खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या या कागदपत्राची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमझाक होत आहे. नवीन पासबुक काढायचे झाले तर प्रथम ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. त्यानंतर बँकेत जावून आधार कार्ड, पॅनकार्ड देवून दोन ते पाच हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर बँकेने ठरवून दिलेल्या मुदतीत पासबुक देण्यात येते. याहीपेक्षा त्रासदायक ठरु पाहत आहे पॅनकार्ड मिळवणे. अशा परिस्थितीत कुणाकडे दाद मागावी बँकाच्या या अशा धोरणामुळे इच्छुक उमेदवार वैतागले आहेत.

Post a Comment

0 Comments