Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हुक्का पार्लरवर कोतवाली पोलिसांचा छापा ; 19 जण ताब्यात

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील कल्याण रस्त्यावरील हॉटेल दिपाली येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून 19 जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. हॉटेल मालक सचिन चंद्रशेखर शिंदे हे पसार झाले असून हे हॉटेल विशाल सुपेकर व गणेश राजळे हे दोघे भागीदारी चालवीत होते. छाप यादरम्यान सुगंधी तंबाखू व हुक्का पट असा 4 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ओंकार प्रवीण कडीपील्ली (नालेगाव), भावेश कैलास कुरापाटी (दिल्ली गेट), रोहित ज्ञानेश्वर गुडा (तोफखाना), मोमीन कुतुबुद्दीन मोवीन (रेल्वे स्टेशन), कार्तिक अशोक कानडे (मोहिनीनगर केडगाव), संतोष सूर्यभान शिरसाठ (दूधसागर केडगाव), ओंकार नरेंद्र दुल्लम (बागडपट्टी), ओंकार गणेश रायबेल्ली (मोचीगल्ली), मणियार शाहबल अब्दुल करीम (मोमीनपुरा), अजहर रफीक शेख (आशा टाॅकीज चौक), अरबाज मुश्ताक शेख (गोविंदपुरा), परवेझ नियाज तांबोळी (रामचंद्रखुंट), उबेत अफरोज तांबोळी (रामचंद्र खुंट), अरबाज सय्यद (सुभेदारगल्ली), रईस नफीस खान (मुकुंदनगर), शादाब सादीक शेख (सुभेदारगल्ली) व हाॅटेल व्यवपाक विशाल चव्हाण (शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई मनोज कचरे, पोना नितीन शिंदे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, विष्णू भागवत, पोकाॅ सुमित गवळी, कैलास शिरसाट, भारत इंगळे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, योगेश कवाष्टे, सुशील वाघेल, सुजय हिवाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments