Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जेऊर शिवारात 'आयजी'च्या पोलीस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा ; 17 जण ताब्यात, 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या जेऊर गावच्या शिवारातील जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि. 17) रात्री विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत 17 जुगार-यांना ताब्यात घेऊन एकूण 13 लाख 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर गावच्या शिवारात चाफेवाडी रस्त्याच्याजवळ अंबादास म्हस्के यांच्या मालकीच्या शेतातील झाडालगत मोकळ्या जागेत बसून 52 पत्त्यांच्या कॅटमधील अंकावर व चित्रावर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात महेश भगवान साळवे ( वय 58, रा. विनायकनगर अहमदनगर), प्रतिक दादासाहेब हिवाळे (वय 25 रा. हरेगाव श्रीरामपूर), शौकत दिलवार शेख ( वय 31 रा. इंदिरानगर पाथर्डी), अय्युब अब्बास शेख (वय 25 रा. नाथनगर पाथर्डी), जमीर निजाम शेख ( वय 45, रा. शिवाजीनगर कल्याणरोड अहमदनगर), अविनाश बाळासाहेब तोडमल (वय 25 रा. बाळजाताई तापेवाडी जेऊर, अ.नगर ), मधुकर नाथाजी मोहिते (वय 40 रा. शिवाजीनगर कल्याणरोड अहमदनगर), प्रणव सुनील पंचमुख (वय 19 रा. आंबेडकर कॉलनी भिंगार कॅम्प अहमदनगर), दत्तात्रय रामदास गवळी (वय 38 रा. घोडेगाव ता. नेवासा जि.अहमदनगर), समीर जाकीर शेख (वय 28 रा. जुना मुकुंदनगर अहमदनगर), दिपक देविदास पवार (वय 27, रा. बायजाबाई चाफेवाडी, अ.नगर), सागर आनंद दिवे (वय 35 रा. सिद्धार्थनगर अहमदनगर), मतीन खलील सय्यद (वय 30 रा. जुना मुकुंदनगर अहमदनगर), आदी 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. छाप्या दरम्यान 2 लाख 68 हजार 360 रुपये रोख रक्कम व 8 लाख रुपये किंमतीची कार, 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकली, 2, 550 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य असा एकूण 13 लाख 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत भाग-6 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही सर्व कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिगावकर यांच्या पोलीस पथकाने केली आहे.Post a Comment

0 Comments