Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी साहित्य मंडळ (मुंबई) च्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी लेखिका लीना कोळपकर -आढे

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ ( मुंबई ) या प्रख्यात संस्थेने महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्षांची यादी नुकतीच जाहीर केली.
यामध्ये अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी लेखिका लीना कोळपकर- आढे यांची नियुक्ती करण्यात आली. 
साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्रीं ललिता गवांदे यांच्या उपस्थितीत, सरचिटणीस कवयित्रीं सोनम ठाकूर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्ष जाहीर केले. या समारंभात अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी लेखिका लीना कोळपकर - आढे यांचेवर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाज समाजोन्नती मंडळाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मंगेश रासने, जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार राजेंद्र येंडे,महिला जिल्हाध्यक्षा शैलाताई रासने , शहराध्यक्ष सचिन कासार, शहर संघटक विशाल कडुसकर तसेच समस्त कासार समाज बांधवांसह विविध क्षेत्रातुन लेखिका लीना आढे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments