Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्य सरकार हे कुठलीही वचनपूर्ती करू शकेल नाही : आमदार देवयाणी फरांदे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : राज्य सरकार हे कुठलीही वचनपूर्ती करू शकेल नसून, सर्वच आघाडीवर महाविकास आघाडी अपयशी ठरले असून हे राज्य सरकार गरीबांचे नसून, मोठ्या धनदांडग्याचे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया देत या सरकारमध्ये सर्व प्रशासनावर राष्ट्रवादीची पकड असल्याचे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस तथा नाशिकच्या आमदार देवयाणी फरांदे यांनी अहमदनगर येथे पञकारांशी बोलताना सांगितले.
अहमदनगर शहर भाजपच्यावतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी आ. फरांदे नगरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर टीका केली. यावेळी भाजपाचे माजीमंञी प्रा.राम शिंदे, ज्येष्ठ नेते अॅड अभय आगरकर, नगर शहराध्यक्ष नगरसेवक भैय्या गंधे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सह संयोजक डाॅ. ज्ञानेश्वर दराडे, सुनील रामदासी, सचिन पारखी, वंदना पंडित, नरेंद्र कुलकर्णी आदिसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार फरांदे पुढे म्हणाल्या  की, कोरोनाच्या काळात राज्य सरकार हे उपाययोजना केल्या नाहीत. महिलांवर अत्याचार वाढले असून, गुन्हेगार मोकाट आहेत. ''अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेने केलेली तोडफाड सूडबुद्धीने झाली असल्याचे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगणाची जाहीर माफी मागावी'', अशी मागणी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी रविवारी येथे केली. दरम्यान, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नव्हे तर राष्ट्रवादीची सरकारवर पकड आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस निर्णय घेतात व त्याला ठाकरे बळी पडतात'', असा दावाही त्यांनी केला.


👉भाजप प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना बोलू देण्याच्या विषयावरून मुकुंद देवगावकर व माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी यांच्यात वाद व हाणामारीही झाल्याचे समजते. या विषयाची चर्चा शिबिर स्थळी चविष्ट झाली होती.😎
''कंगणा व अर्णबसंदर्भातील न्यायालयाच्या निकालाने महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली आहे. सरकारची भूमिका अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे व सरकारने सूडबुद्धीने वागू नये, असे झणझणीत अंजन न्यायालयाने घातले आहे,'' असे स्पष्ट करून आ. फरांदे म्हणाल्या, ''कंगणाच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी तसेच कंगणाला द्यावी लागणारी नुकसान भरपाई सरकारच्या तिजोरीतून व जनतेच्या खिशातून जाणार असल्याने त्याबाबतही दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, कोरोना काळात सरकारने वीज दरवाढ केली, तसेच दारूची दुकाने उघडली, पण मंदिरे बंदच ठेवली, दूध आंदोलनेही झाली. पण आंदोलनांची व मागण्यांची दखल घेण्यात मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता दिसली नाही. उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादीसमवेत जाऊन इतके कसे बिघडू शकतात?', असा सवालही आ. फरांदे यांनी केला. कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या जनतेचा खिसा वीज बिल दरवाढ करून महाविकास आघाडी सरकारने कापला, कोरोना काळात देशात सर्वाधिक ४६ हजार ९०० मृत्यू महाराष्ट्रात झाले, सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात होते, मृतदेहांची हेळसांड झाली, राज्यातील सरकारचा नियोजनशून्य कारभार यातून दिसला, अशी टीका करून, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या बारा बलुतेदारांना, सलून व्यावसायिकांना, मंदिरांबाहेर विविध व्यवसाय करणारांना १ रुपयांचीही मदत राज्य सरकारने केली नाही तसेच अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींची जाहीर केलेली मदतही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, असा दावाही त्यांनी केला. शिक्षण व परीक्षांची हेळसांड झाली, महिलांवरील अत्याचार वाढले पण दिशा कायदा आला नाही, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश आले व ओबीसींनाही दिलासा देता आला नसल्याने या दोन्हींनाही न्याय मिळाला नाही, अशी टीका त्यांनी केली.
एकमेकांच्या स्पर्धेतून व विसंवादातूनच हे सरकार पडेल, असा दावा करून त्या म्हणाल्या, कोरोनामुळे जीएसटीची तूट देशभरात आहे, पण केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीपोटी कर्ज घेण्याची मुभा दिली आहे. पण तसे न करता जनता अडचणीत असताना कायम केंद्राकडे बोट दाखवणारे हे करंटे व निष्क्रिय सरकार आहे. पंतप्रधान मोदींनी करोना संकट काळातही आत्मनिर्भर योजना व गरीब कल्याण योजना राबवल्या, पण राज्यातील सरकारला अशा जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवता आल्या नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे राज्य सरकारचा गाडा चालवू शकले नाही व त्यांना चालवूही दिला जात नाही, असा दावाही त्यांनी केला.Post a Comment

0 Comments