Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कांद्याने रडवले पण झेंडूने तारले गोरेगावला फुलशेतीचा आधार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर   
 अहमदनगर  - नगर कल्याण रोडवरील डोंगराळ भागात यंदा चांगला पाऊस झाला छोटे मोठे बंधारे नदी तळे विहिरी तुटुंब भरली अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली पण भाव कमी जास्त प्रमाणात होत राहिल्याने काही शेतकरी हवालदिल झाले होते.       गोरेगाव येथील शेतकरी खंडू नरसाळे यांनी दोन एकर क्षेत्रावर कांदा केला पण भाव मिळाला नाही आता अर्धा एकर क्षेत्रात चार हजार झेंडूची झाडे लावली दिवाळी पाडवा सणात सध्या200रु भाव मिळत असल्याने4लाख रुपये फुलाने मिळवून दिले कांद्याने रडवले पण फुलाने तारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली या गावातील अनेक शेतकऱ्यांनी फुलशेती करून कांद्याचा तोटा फुलांनी भरून काढला आहे.

संकलन : विजय मतेPost a Comment

0 Comments