Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वारकरी सांप्रदायाची सोपी वाट संतांनी निर्माण केली : मेटे महाराज

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शास्त्रात परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत मात्र वारकरी संतांनी भगवत प्राप्तीची सोपी वाट निर्माण केली असे प्रतिपादन युवक प्रबोधन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील जागृत देवस्थान वारुळाचा मारुती मंदिर येथे आषाढी एकादशी, चातुर्मास समाप्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. दळवी बाबा, खंडेराव कवडे सर, बाळासाहेब वाघ, मनोज गायकवाड, सुभाष रोहोकले, आदापुरे टेलर, बाळासाहेब देशमुख, धर्माजी कदम, सौ. आक्काबाई पवार, माऊली वाघ, बाबासाहेब वाघ, लांडे ताई, युवराज रोहोकले, आदी. उपस्थित होते.
पुढे बोलतांना मेटे महाराज म्हणाले की, तिर्थयात्रा केल्याने पुण्य मिळते, पापक्षालन होते, मोक्ष व मुक्ती मिळते असे शास्त्रामध्ये सांगिलते आहे मात्र शेतकरी, कष्टकरी, वारकरी संसारी माणसांना ते शक्य नसल्याने संतांनी सोपी वाट निर्माण केली ती म्हणजे पंढरी. या पंढरीत आल्यानंतर सर्व तिर्थांना गेल्याचे फळ मिळते. भक्ती करण्यासाठी कोणत्याही अवघड मार्गाचा अवलंब न करता नामश्चिंतन हो सोपा मार्ग संतांनी सांगीतला. आषाढी आणि कार्तीकी एकादशी निमित्त प्रतिवर्षी पंढरपुरमध्ये वारकरी मोठ्या श्रध्देने पायी वारी करतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पांडूरंगाच्या मंदिरा समोर सोशल डिस्टशींग ठेवून कार्यक्रम करण्यात आला.

चातुर्मास समाप्ती निमित्त दळवी बाबांचा सत्कार
ह.भ.प. दळवी बाबा यांनी चातुर्मास कालावधीत जागृत देवस्थान वारुळाचा मारुती मंदिरात पहाटे काकडा, सकाळी ग्रंथ वाचन, हरिपाठ आदी दैनिक कार्यक्रम नित्यनियमाने केल्याबद्दल परिसरातील नागरीकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments