Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर ; नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर :- भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्‍या मतदारांना आणि नवीन मतदार म्‍हणून पात्र असलेल्‍या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दि. 30 सप्‍टेंबर 2020 पासून राबविला जात असून ते 15 जानेवारी 2021 पर्यंत  राबविला जाणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 नोव्‍हेबर 2020 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-6 म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे दि. 01 जानेवारी 2021 रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादित नांव नाही,अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना -6 भरुन द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादितील तपशिलात (नांव,वय,लिंग,फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करुन घेणेसाठी फॉर्म नमुना-8 भरुन द्यावा.अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादीत मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची संख्या अद्यापही आढळून येत असल्यामुळे त्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वत: पुढाकार घ्यावा. व मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नांवे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुंटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नांव मतदार यादिमधून वगळण्यासाठी मृत्युच्या दाखल्यासह फॉर्म नमुना-7 भरुन द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अधिक माहिती दिली.  ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत. अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नांव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना-7 भरुन देणे. मतदाराचे जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास, त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नांवाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नांव मतदार यादीत समाविष्ट करावे. अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादिमध्ये ज्या मतदारांचे फोटो नाहीत, अशा मतदारांनी आपला पासपोर्ट साइज फोटो आपले संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे जमा करावा. 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची नांव नोंदणी वाढविणेसाठी संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पुढाकार घेउन महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्याचे वय दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु मतदार यादित नांव नाही अशा विद्यार्थांची नांव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.       
अहमदनगर जिल्ह्याच्या मतदार यादित स्त्री-पुरुष प्रमाण 923 इतके आहे. त्यामुळे महिला मतदारांची नांव नोंदणी वाढविण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,महिला बचतग़ट,यांनी यासाठी गावोगावी विशेष मोहिम घेउन गावातील ज्या महिलांचे वय दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी 18 वर्षपूर्ण होत आहे. परंतु मतदार यादित नांव नाही अशा महिलांची नांवे मतदार यादित समाविष्ट करुन घ्यावी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.                    
 नागरीकांसाठी सुविधा :- नागरीकांकडून दावे व हरकती स्वीकारणेसाठी दि. 17 नोव्‍हेंबर ते 15 डिसेंबर 2021 हा कालावधी असून सदरच्‍या हरकती स्‍वीकारणेकामी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय (BLO) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरीकांच्या मदतीसाठी  तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्र (Voters Help Centre) सुरु करण्यात आलेले आहे. नागरीकांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती प्राप्त करुन घेणेसाठी तहसिल कार्यालयात HELP LINE  सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  त्याचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

तालुका व दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे 
अकोले (02424-221028), संगमनेर (02425-221670), राहाता (02423-242853), कोपरगाव (02423-221940), श्रीरामपूर (02422-222239), नेवासा (02427-241171), शेवगाव (02429-221435), पाथर्डी (02428-221332), राहुरी (02426-232260), पारनेर (02488-221128), नगर (0241-2344600), श्रीगोदा (02487-222168), कर्जत (02489-222328), जामखेड (02421-222037).

मतदारयादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करणे व इतर  तदनुषंगिक बाबीसाठी उपविभागीय अधिकारी हे मतदार नोंदणी अधिकारी  म्हणून आणि तहसिलदार हे सहाय्यक  मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहतील. पुनरिक्षण कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे. 

पुन:रिक्षण कार्यक्रमाचा तपशिल :- मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण करणे, दुबार / समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील तृटी दुर करणे (यादी भागातील दुबार / समान नोंदी संदर्भातील तृटी दि. 31/08/2020 पर्यत करणे,  विभाग / भाग पुन्‍हा तयार करणे आणि मतदानाच्‍या क्षेत्राच्‍या / भागांच्‍यया सीमेच्‍या पुनर्रचनेचे प्रस्‍ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्राची यादी मंजूर करणे

दि. 30 सप्‍टेंबर 2020  (बुधवार) ते
दि. 31ऑक्‍टोंबर  2020,    नमुना 1 ते 8 तयार करणे.  पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करणे. दि. 1 नोव्‍हेंबर, 2020 (रविवार) ते दि. 15 नोव्‍हेंबर, 2020 (रविवार)

पुनरिक्षण उपक्रम -
एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे
दि. 17 नोव्‍हेंबर, 2020 (मंगळवार)
दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी
दि. 17 नोव्‍हेंबर, 2020 (मंगळवार) ते  दि. 15 डिसेंबर, 2020 (मंगळवार)
विशेष मोहिमेचा कालावधी - दावे व हरकती स्विाकारण्‍याच्‍या कालावधीत, मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र यांनी निश्चित केलेल दोन शनिवार आणि रविवार
दावे हरकती निकालात काढणे - दि. 5 जानेवारी, 2021 (मंगळवार) पर्यत. प्रारुप मतदार यादीच्‍या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दी करीता आयोगाची परवानगी घेणे.  डेटाबेसचे अद्दयावतीकरण आणि पुरवणी याद्दयांची छपाई करणे. 
दि. 14 फेब्रुवारी, 2020 (गुरुवार)  पुर्वी
मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी करणे - दि.15 जानेवारी, 2021(शुक्रवार)  
मतदारांसाठी आवश्यक  प्रमुख नमुने :- तपशिल नमुना नवीन  नाव नोंदणीसाठी (नमुना-6), तपशिलात दुरुस्ती करणेसाठी (नमुना-8), नावाची वगळणी करणेसाठी (नमुना-7), मतदारसंघात नाव बदली करणेसाठी (नमुना-8 A), 
सदर पुनःरिक्षण कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्‍वाचा असून, राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधींची मतदान केंद्रस्‍तरीय प्रतिनिधी (बी.एल.ए.) म्‍हणून नेमणूक करावी. 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष्‍ संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्‍यामुळे जिल्‍हयातील  सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील 3722 मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांची कार्यालये तथा मतदान केंद्रे या‍ ठिकाणी संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येणार असून, सदर कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविला जात आहे किंवा कसे? याची तपासणी करण्‍याकरीता विशेष उपाययोजना राबविण्‍यात येणार आहेत. तरी नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी यामध्‍ये सक्रीय सहभाग घेऊन सदर पुनःरिक्षण कार्यक्रम अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये यशस्‍वीपणे राबविण्‍यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.                       

 


Post a Comment

0 Comments