Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांची अहमदनगर जिल्ह्यात गतिमान अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घेतला आढावा बैठक

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण ' राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज नाशिक विभागीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी जिल्ह्यातील योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांची अहमदनगर जिल्ह्यात गतिमान अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी सर्व गटविकास अधिकारी यांनी या योजने संदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव येत्या आठ दिवसांत जिल्हा यंत्रणांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. ' महा आवास अभियान - ग्रामीण ' यामधे अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments