Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

समाजातील कष्टकरी घटकांच्या हस्ते आगळा वेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : - शहरातील केडगाव येथील सामजिक कार्यकर्ते कवी संजय आंधळे उर्फ सुभद्रासुत यांचा स्वलिखीत "झरा जाणीवांचा" समीक्षा प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने नुकतेच कवी सुभद्रासुत यांच्या काव्यकुज केडगाव येथे प्रकाशित करण्यात आला. यावेळी नगर शहर पंचक्रोशीतील काव्यावर प्रेम करणारी विविध कष्टकरी व समाजातील विविधअंगी महत्वाच्या घटकांपैकी ११ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जनजागृती मंच केडगाव व केडगाव प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. 
 या कार्यक्रमाची सुरुवात 'तुळशी कुंभ जलदान' तुळशीला पानी घालणे या संकल्पनेतून वेगळेपणाने करण्यात आली व पुस्तक प्रकाशन हे कवी सुभद्रासुत उर्फ संजय आंधळे यांच्या समवेत सौ. शिला आंधळे, सेवा निवृत्त पोलिस उपनिरिक्षक सुभाष सोनवणे, डाॅ. प्रशांत महांडुळे , पञकार भुषण देशमुख, प्रा.डॉ. भणगे शैलेंद्र, अॅड संतोष गायकवाड, फोटोग्राफर बन्सी शेळके, आनंदा साळवे, 
संगणक अभियंता सौ. अंजली साठे, सुखदेव काळे, गोंधळी कैलास धुमाळ, अशा समाजाशी निगडीत वाचनावर प्रेम करणार्‍या या मान्यवरांच्या हस्ते झरा जाणीवांचा या काव्य संग्रहाचे गोंधळ्याच्या तालात प्रकाशन करण्यात आले. यावेळी मोतीनगर परिसरातील ५० प्रेक्षक उपस्थित होते. 
प्रकाशनानंतर वरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कवी संजय आंधळे यांनी आपल्या पुस्तकातून समाजातील विविध घटकांना नजरेत ठेऊन त्यांच्या उणीवा, त्यांच्यावरील परिस्थिती व त्या मधील सतत होणार्‍या चुका व विसंगती याची विविध कवितेतून जाणीव करुन दिली तसेच हे पुस्तक समाजातील बाल पासुन वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या हितासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. हा काव्यसंग्रह लग्न व विविध समारंभात भेट देण्यायोग्य आहे असेही व्यक्त केले. या पुस्तकातील दिनविशेषाबद्दल व विविध काव्यविषयांबद्दल उपस्थीत मान्यवरांने कोतुक केले.पुस्तकांचे लेखक कवी सुभद्रासुत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना झरा जाणिवांचा हा काव्य संग्रह म्हणजे माझ्या संजय नावाऐवजी सुभद्रासुत या नावाने सुभद्रामातेचा ऋणमुक्त दृष्टीने प्रबोधन ओवीच आहे असेही व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रथम प्रास्तविक बन्सी शेळके तर आभार प्रदर्शन संजय गाडीलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. महेश्वरी मिसाळ यांनी पार पाडले.

Post a Comment

0 Comments