Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री गोरक्षनाथ प्रकटदिन सोहळा उत्साहातऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान भिंगार येथे सालाबाद प्रमाणे गोरक्षनाथ प्रकटदिन मोठ्या उत्साहाने चैतन्यमयी वातावरणात संपन्न झाला.
कै. हिरा महाराज चव्हाण यांनी गेल्या ३५ ते ४० वर्षापुर्वी भिंगार येथे गोरक्षनाथ मंदिराची स्थापना केली. या मंदिरात गर्भगिरी डोंगरावरून आणलेल्या विशाल दगडाच्या शिलेवर गोरक्षनाथांची मुर्ती विराजमान केली आहे. हिरा महाराज चव्हाण यांच्या नंतर त्यांचे पुत्र विजय महाराज हे मंदिरात पुजाअर्चा व संपुर्ण व्यवस्थापन करतात. विजय महाराज यांनी त्यांचे वडील हिरा महाराज यांची परंपरा पुढे चालू ठेवत भक्तगण वाढवले आहेत. 
गोरक्षनाथ प्रकटदिन सोहळाच्या निमित्ताने होम हवन , अभिषेक करुन महाआरती करण्यात आली. तसेच भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकट दिनाच्या निमित्ताने गोरक्षनाथ भक्त सचिन रोडे , विजय महाराज, विशाल येंडे यांच्यासह इतर नाथभक्तांच्या सहकार्यातुन गोरक्षनाथांना चांदी पासुन घडवलेला सुबक कलाकुसर असलेला मुकुट नाथ भक्त सचिन रोडे यांच्या हस्ते अर्पण केला. या सोहळ्याचे आयोजन विजय महाराज चव्हान, विशाल येंडे यांनी केले. 
प्रकट दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी नाथभक्त संजुभाऊ बोरगे, राजु रासकर, राजु दळवी, उमेश चव्हाण यांच्यासह नाथ भक्तांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments