Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक यांना मास्‍क न घातलेल्‍यांकडून दंड वसूलीचे अधिकार प्रदान

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर :-  साथरोग अधिनियम 1897 कलम 2 (1) नुसार जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांना अहमदनगर जिल्‍हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍याचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍याउपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहे.
अहमदनगर जिल्‍हयात आगामी कालावधीत कोविड-19 विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्‍क/रुमाल वापरणे तसेच सोशल डिस्‍टन्सिंग पाळणे, आवश्‍यक आहे.
 तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार तसेच अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अहमदनगर व साथरोग 1897 मधील तरतूदी विचारात घेता अहमदनगर जिल्‍हयात सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर कायम मास्‍क/रुमाल वापरणे व सोशल डिस्‍टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळणे याबाबत सर्व नागरीकांना निर्देश दिले आहेत. मास्‍क/रुमाल लावणे व सोशल डिस्‍टन्सिंग (सामाजिक अंतर) चे उल्‍लंघन केल्‍यास अहमदनगर जिल्‍हयातील पोलीस आस्‍थापनेवरील पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना असे उल्‍लंघन करणा-या व्‍यक्‍तींविरुध्‍द रु. 100/- इतकी भरपाई रक्‍कम आकारणे व वसुल करणेबाबत दि.112020 ते 18/11/2020 या कालावधीकरीता प्राधिकृत करीत आहे.                
    जिल्‍हा पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर उल्‍लंघनासाठी योग्‍य ते नियोजन व निर्देश त्‍यांचे अधिनस्‍त पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना देण्‍यात यावेत.
   सदर उल्‍लंघनातून प्राप्‍त झालेली भरपाई रक्‍कम चलनाव्‍दारे संकेतांक (0210067201) या लेखाशिर्षावर भरण्‍यात यावे व केलेल्‍या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्‍हाधिकारी व जिल्‍हादंडाधिकारी यांचे कार्यालयास सादर करावा, असे  डॉ. राजेन्‍द्र ब. भोसले,  जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण,अहमदनगर यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments