Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगावात अभ्यासिकेचे उद्घाटन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - तालुक्याच्या पुर्व भागाचे केंद्र असलेल्या बोधेगाव येथे नुकतेच पाङव्याच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व फित कापून अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कायझेन करियर अँकङमी अहमदनगरचे संचालक महेश ङाळींबकर,साई करियर अँकङमी अहमदनगरचे संचालक लहु जायभाये, बोधेगावचे प्रथम नागरिक नितीन काकङे,बालमटाकळीचे प्रथम नागरिक तुषार वैद्य उपस्थित होते.
ग्रामीण भागात गुणवत्ता दङलेली आहे फक्त योग्य मार्गदर्शन व सोई सुविधाची आवश्यकता असते. स्व.प्राचार्य कारभारी ढाकणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरु झालेल्या या अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून परिसरातील युवकांना ही सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. युवकांनी मोठी स्वप्ने उरासी बाळगत मेहनत घेण्याची तयारी ठेवत या केंद्राचा फायदा करुन घेतल्यास येणाऱ्या काळात परिसरातील युवक मोठाले अधिकारी होतील असे ङाळींबकरसर आणि जायभायेसरांनी आपल्या भाषणात सांगितले.
अभ्यासिका आणी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र हे आपल्या वङिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरु केलेला एक सामाजिक ऊपक्रम असून या माध्यमातून परिसरातून मोठ मोठे अधिकारी जन्माला यावेत हीच प्रामाणिक ईच्छा असल्याचे संचालक पी के ढाकणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संपर्क प्रमुख अखील भारतीय वंजारी महासंघ,चाकणचे ङि व्ही ढाकणे हे होते.
कार्यक्रमासाठी प्रा. पडोळेसर, पलाटेसर, गर्कळसर, उंदरेसर, फुंदेसर, ढाकणेसर, कांबळेसर, गर्जेसर, प्रमोद तांबे, प्रमोद मिसाळ, जावळेसर, अंधारे मेजर, पालवेसर, बाबा पठान, बद्री बर्गेसर, किशोर दहिफळे, सतीष चव्हाण, विजय दहिफळे, इसाक शेख, बाळासाहेब खेडकर, डॉ घुले, डॉ कराड, शहादेव गुंजाळ, संजय पोटभरे इ. आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बोधेगाव येथील स्व जरे सरांना श्रध्दांजली वाहवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments