Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी नेत्याच्या अंबालिका कारखान्यानजिक खून ? ; सीआयडी चौकशीची मागणी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याजवळ  कोपर्डी येथील मयत समाधान रमेश शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु त्या संबंधितावर मेडिकल रिपोर्टनुसार 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून या गुन्ह्याची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी फिर्यादी बाळू रमेश शिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिंदे कुटुंबास न्याय न मिळाल्यास धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी दिला आहे. मयत समाधान रमेश शिंदे याच्यावर ट्रॅक्टर चोरीचा संशय घेऊन त्याला जबर मारहाण करण्यात आली होती या मारहाणीमुळे समाधान शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. मयत शिंदे याला अंबालिका कारखान्याजवळील जंगलात लिंबाच्या झाडाला फासावर लटकविण्यात आले. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात दि.11 नोव्हेंबरला गणेश नारायण मोरे, धनंजय बबन गुंड (रा. नांदगाव ता. कर्जत), काका ज्ञानदेव सुद्रिक (रा. कोपर्डी ता. कर्जत) यांच्याविरुद्ध 306, 323, 506, 34, 3(1)(r),3(1)(s),3(2)(va) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मेडीकल रिपोर्टनुसार मयत समाधान शिंदे याला जबर मारहाण झाल्याचे दिसून येत आहे घटनेतील संबंधित सर्व आरोपींवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा न्याय न दिल्यास माझे सर्व कुटुंब दि. 22 नोव्हेंबर पासून माझ्या घराजवळ सकाळी 11 वाजल्यापासून धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात मयत शिंदे याचा भाऊ बाळू शिंदे याने म्हटले आहे.Post a Comment

0 Comments