Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'क्युआर कोड स्कॅन' करून पैसे खात्यात जमा झाल्याचे भासवून दुकानदारांची लाखोंची फसवणूक ; एलसीबीकडून आरोपी जेरबंद

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर- क्युआर कोड स्कॅन करून पैसे खात्यात जमा झाल्याचे भासवून दुकानदारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी अहमदनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली
दुकानामध्ये जाऊन वस्तूची खरेदी करत असे, यानंतर ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून दुकानात लावण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करत होते. एका अँड्रॉइड ॲपचा वापर करत ऑनलाइन पेमेंट केल्याचा खोटा एसएमएस पाठवून लाखोंची फसवणूक करणारी टोळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता ( सर्व रा. भोसरी, पुणे) अशी असून, या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments