Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सेवानिवृत्त मंडल अधिकारी एकनाथ बडे यांचा चिंचपूर पांगुळ मानेवाडी ग्रामस्थांतर्फे सत्कार

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
पाथर्डी - सेवानिवृत्त झाल्याबद्दल मंडल अधिकारी एकनाथ बडे यांचा नुकताच चिंचपूर पांगुळ मानेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच धनंजय पा. बडे तर अध्यक्षस्थानी गहिनीनाथ बडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सरपंच धनंजय पा.बडे म्हणाले की, एकनाथ बडे साहेब यांना चिंचपूर पांगुळ डोंगर पट्ट्यातील हिरा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. महसूल विभागातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहिले गेलेले टाकळीमानुरचे मंडल अधिकारी एकनाथ बडे हे सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु श्री बडे यांचा महसूल विभागातील पूर्व अनुभव पाहता, त्यांनी चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांना महसूल विभागात येणाऱ्या अडचणीच्या कामात मार्गदर्शन करून एक प्रकारे समाजसेवा करावी असे ते म्हणाले.
सत्कारमूर्ती एकनाथ बडे म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर चिंचपूर पांगुळ मानेवाडी ग्रामस्थांनी माझा केलेला सत्कार याचा मी सर्व ग्रामस्थांचा ऋणी आहे. महसूल विभागातील पूर्व अनुभवानुसार ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करून एक प्रकारे समाजसेवा करणार आहोत. ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या अडचणीबाबत मला सांगावे मी त्या संबंधितांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहील अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरीनाथ बडे यांनी केले. सूत्रसंचालन बाबा ढाकणे यांनी केले तर आभार महादेव बारगजे यांनी मानले. यावेळी उपसरपंच आजिनाथ बडे, धोंडीबा धायतडक, मारुती खाडे, चेअरमन मारुतीदाजी बडे, पंढरीनाथ बडे, पांडुरंग बडे, नामदेव बडे, महादेव बारगजे, रामनाथ बडे, सोमनाथ धायतडक, हनुमान बडे, रमेश धायतडक, अक्षय बडे, दीपक बडे, एकनाथ बडे, तुकाराम बडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सेवानिवृत्त एकनाथ रामजी बडे यांच्या महसूल विभागातील कार्यकाळात त्यांनी तलाठी म्हणून देवळालीप्रवरा, कुकाणा, जाटदेवळा, माणिकदौंडी येथे काम केले. यानंतर 1998 साली श्री बडे यांना खर्डा (जामखेड) येथे प्रमोशन मिळाले. 2002 साली अव्वल कारकून म्हणून पाथर्डी तहसील कार्यालयात त्यांची बदली झाली.2003 ते आज अखेर 2020 मध्ये श्री बडे हे टाकळीमानूर येथे मंडल अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

Post a Comment

0 Comments