Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या मुलीस भिंगार पोलिसांच्या सहकार्याने मिळाले पैसे परत!

 
आर्थिक फसवणूक झालेल्या मुलीने भिंगार कॅम्प पोलिसांचे मानले आभार 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- वनविभागात नोकरी लावतो, असे म्हणून लाख रुपये घेऊन फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगार मुलीचे पैसे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांच्या सहकार्याने त्या मुलीस परत मिळाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर येथील एका सुशिक्षित बेरोजगार मुलीस तुला वनविभागात नोकरीस लावतो म्हणून, असे आश्वासन देत तिच्याकडून लाख रुपये घेतले. यानंतर त्याने एक वर्षे खोटेनाटे सांगून तिला फसवित होता. शेवटी त्या मुलीने आपली फसवणूक झालेली कैफियत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांच्याकडे मांडली. यानंतर श्री पाटील य ांनी घटनाक्रम समजावून घेत, त्या संबंधितांकडून नोकरी लावतो म्हणून घेतलेली लाख रुपये परत मिळून दिले. या महत्त्वपूर्ण कामगिरी बद्दल त्या मुलीने पोलिस प्रशासनाचे व वैयक्तिक भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील व त्याचे सहकारी पोलिस कर्मचारी श्री साठे, राजेंद्र सुद्रीक आदिसह अन्य पोलिस कर्मचा-यांचे आभार मानले. तसेच या कामगिरी बद्दल सामाजिक संघटनांनी भिंगार कॅम्प पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments