Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डाॅ.ज्ञानेश्वर दराडे यांची प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सह संयोजक पदी नियुक्ती

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- मोहाटदेवी देवस्थानचे विश्वस्त तथा अहमदनगर क्रिस्टल रुग्णालयाचे संचालक डाॅ.ज्ञानेश्वर दराडे यांची प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सह संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील आदेशाने व वैद्यकीय आघाडीचे प्रदेश प्रभारी आ.गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.अजित गोपछडे यांनी डाॅ.दराडे यांना हे नियुक्तीपञ दिले आहे.
डाॅ.दराडे यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय महामंञी पंकजा मुंडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, खासदार डाॅ.सुजय विखे पा, आमदार मोनिकाताई राजळे, माजीमंञी प्रा.राम शिंदे, माजीमंञी केंद्रीयमंञी दिलीप गांधी, प्रा.भानुदास बेरड, अभय आव्हाड, रामनाथ बंग, डाॅ.जितेंद्र ढवळे, डॉ.श्रीधर देशमुख, पाथर्डी नगरध्यक्ष डाॅ.मृत्युंजय गर्जे, डाॅ.उरुणकर, विनायक बडे पा., अजिनाथ कर्डिले, दादा तळेकर, नगरसेवक भैय्या गंधे, पंकज जहागीरदार, डाॅ. विक्रम भोसले आदिसह अहमदनगर जिल्ह्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments