Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुचाकीवर येऊन मोबाईल हिसकविणारा चोरटा अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - मोबाईलवर बोलत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेणारा चोरटा अखेर पोलिसांनी जेरबंद केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सलमान सलीम ईराणी (वय २१ रा.वॉर्ड नं .१ ईराणीवस्ती श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील इंद्रप्रस्थ मंगलकार्यालयाजवळ फोनवर बोलत असताना त्याचे पाठीमागून दोन इसम स्कुटी मोटारसायकलवर येऊन हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले, अशी फिर्याद आर्दश श्याम शिरोळे यांनी बुधवारी (दि.18) दिली होती. या फिर्यादीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं . 1 २१७६/२०२० भादवि कलम ३ ९ २,३४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास चालू होता. या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक श्रीरामपूर येथे जावून सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.सदर पकडलेल्या आरोपी सलमान सलीम ईराणी (वय २१ रा.वॉर्ड नं .१ ईराणीवस्ती श्रीरापमुर) यास ताब्यात घेतले. त्याला घडलेल्या गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयात चोरी गेलेला रेडमी कंपनीचा १५ हजार रु किंमतीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली २५,००० रु किंमतीची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा स्कुटी असा एकूण ४० हजार रु.मुद्देमाल आरोपी याचेकडुन हस्तगत करण्यात आला . आरोपी यास सदर गुन्हा करतेवळी त्याचे साथीदाराबाबत विचारले असता त्याने साथीदाराचे नांव सांगण्यास टाळाटाळ केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना रवी सोनटक्के, मनोज गोसावी, संतोष लोढे, प्रकाश वाघ, रोहीत येमुल, चापोहेकॉ कोतकर आदिच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments