Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आदर्श माता फुलाई उद्यानचे भूमिपूजन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
आष्टी - तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा येथे संत शेख महंमद महाराजांच्या आई फुलाई माता यांच्या नावे आदर्श माता फुलाई उद्यानाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य उध्दव बापु दरेकर, पंचायत समिती सदस्या सौ. मेघना दादासाहेब झांजे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, सरपंच सौ.शकुंतला फरतारे, पोलिस आधिकरी आनंद पगारे, तिवसा तालुक्याचे तहसिलदार वैभव फरतारे, पांडूरंग गावडे, शिवाजी झांजे पोलीस पाटील ,सौ.प्रतिभा थोरवे, सौ.सिंधूताई गावडे, सौ. छायाताई कवडे, सौ. कमल झांजे, सौ.सुमन आटोळे, ग्रामसेविका सौ. वर्षाताई भोपळे, शरद गावडे, शिवाजी आटोळे, तानाजी अनभुले, उद्योजक गणेश झांजे,गणेश माळशिकारे, सौ. वैजंताबाई पवार, सतीश चंदिले, रवी फरतारे, उद्योजक हरिदास झांजे, रूपचंद झांजे,संतोष झांजे, संत शेख महंमद महाराजांचे वंशज मोसिम महाराज शेख, फक्कड झांजे , अशोक चंदीले, बारकू माळशीखरे,अमोल कुलथे, भाऊ पवार , आदी मान्यवर उपस्थित होते. 
संत शिरोमणी शेख महंमद महाराज साहित्य परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेख महंमद महाराजांचे वडिल राज महंमद तर आई फुलाई माता होत्या. त्यांनी संत शेख महंमद महाराजांवर जे सुसंस्कार घडवले म्हणून हा हिरा जगाला प्रकाशमान करु शकला. ईस्लामी सत्ता असुनही कोणत्याही प्रस्थापित शाह्यांना न डगमगता वारकरी संप्रदायाची मदार त्यांनी आपल्या खांदी घेतली व हिंदु मुस्लिम मधील भेद नाहीसा केला. या कार्यकर्तुत्वावर वारकरी संतांनी मांदियाळीत त्यांना मानाचे स्थान दिले. हे सर्व त्यांच्या आई वडिलांच्या संस्कार शिदोरीमुळे झाल्याने त्यांनी योगसंग्राम ग्रंथात सांगितले आहे. फुलाईचे विचार आजच्या महिलांना आदर्श प्राप्त करुन देणारे आहेत. महिलांनी फुलांईंच्या विचातुन प्रेरणा घ्यावी व नव पिढी सुदृढ व्हावी या उद्देशाने आदर्श माता फुलाई उद्यान करण्याचा संकल्प पुढे आला असे संत शेख महंमद महाराज साहित्य परिषदेचे सचिव किसन आटोळे सर यांनी सांगितले. प्रस्ताविक परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले तर सुत्रसंचालन महादेव झांजे यांनी केले.

Post a Comment

0 Comments