Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विळद, खारेकर्जून परिसरातील ऊसात बिबट्याची पिल्ल आढळली ; बिबट्याच्या दर्शनाने नागरीक भयभीत

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : जिल्ह्यात पाथर्डी व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्यात महिला व लहान मुले ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर अहमदनगर शहराजवळील कापूरवाडी, विळद आणि खारेकर्जून येथे बिबट्याची पिल्ले ऊस शेतीत आढळून आली आहे. यामुळे नगर तालुका परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा वावर नगर तालुक्यात वाढल्याने काही घटना घडण्यापूर्वीच बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments