Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घोडेश्वरीदेवीचे हिरे, चांदीच्या दागिन्यांची चोरी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगावच्या श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना झाली. मंदिरीच्या गाभाऱ्यामधील १७ किलो चांदी व त्यावरील हिरे, असा एकूण सुमारे ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व दत्तात्रय थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली. 
मंदिर गाभाऱ्यात ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते. मंदिरात चोरी झाल्याचे समजतात ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्याचा फायदा चोरांना झाला. पोलिसांना देखील चोरांचा माग काढणे आता उघड होणार आहे.

Post a Comment

0 Comments