Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संगमनेरचे पोलीस उपनिरीक्षक यांना लाच घेताना पकडले ; नाशिक लाचलुचपत विभागांची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
संगमनेर : संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. 
मालदाड रोड याठिकाणी अतिष संजय डमरे यांच्या घरी कोणही नसताना आतिश याने त्याच्याच घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांच्या मुद्धेमाल चोराला होता. त्यांनतर त्याने मित्र सुरज वाघ व त्याची पत्नी निकिता वाघ यांच्या मदतीने नाशिक येथील सोनाराला विकले होते. याप्रकरणी आतीषची आई मंगल संजय डमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी व सचिन उगले याप्रकरणाचा तपास करीत असताना अतिश डमरे व सुरज वाघ यांना गोवा बीचवर पकडले होते. त्यांनतर यात नाशिक येथील एका सराफाचे नाव या प्रकरणात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राणा यांनी सराफाकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानुसार सुरुवातीला एक लाख रुपये देण्याचे ठरले. सराफ मंगळवारी दुपारी परदेशी यांना पैसे देण्यासाठी शहरातील स्टेडीयमजवळ आले असता नाशिक येथील लाचलुचपत पोलिसांनी सापळा रचून परदेशी याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.Post a Comment

0 Comments