Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रेस लिहिलेल्या गाडीतून गांजाची वाहतूक ; अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यात अटक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे -  प्रेस लिहिलेल्या गाडीतून 9 लाखाच्या गांजाची वाहतूक करणा-या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पुणे विमानतळ परिसरात केली. रविंद्र योसेफ आढाव (वय 21), गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय 41) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून,अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ते रहिवाशी आहेत.
समजलेली माहिती अशी की, पोलिसांना मिळाली माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने विमाननगर परिसरातील कमिंस इंडिया कंपनीच्या गेटजवळ आलेल्या एका वाहनाला अडवून तिची तपासणी केली. यावेळी पोलिसांना दोन गोण्यांमध्ये 37 किलो 200 ग्रॅम मिळून आला. या गांजाची किंमत 9.30 लाख रुपये इतकी आहे. दोन्ही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरोधात आरोपींविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्रीचा गुन्हा दाखल आहे. गांजाची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडू नये, यासाठी गाडीच्या समोरील प्रेसचे स्टिकर लावले होते. तसेच निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष या नावाचे स्टिकर ही गाडीवर लावण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments