Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एक मुलगा ठार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
आष्टी : किन्ही येथील शिवराज हिंगे हा बारा वर्षीय मुलगा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आलेला होता.आज दुपारी साडे अकराच्या सुमारास शिवराजला नरभक्षक बिबट्याने उचलून नेले गावातील नागरिकांनी शिवराजचा शोध घेतला असता शिवराज हा बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचे कळाले सदरील घटना अत्यंत दुर्देंवी आहे.त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी वेळीच बिबट्याचा शोध घेणे गरजेचे असून नागरिकांनी आता सावधानता बाळगणे गरजेचे आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक तसेच शेतक-यांनी शेतमजुरांना एकटे न राहता समुहाने काम करावे. सायंकाळी लवकर शेतामधून घरी परतावे. रात्री घराबाहेर झोपु नये. लहान मुलांची विषेश काळजी घ्यावी..!

Post a Comment

0 Comments