Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर पोलिस कॉन्स्टेबल व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थांच्या तक्रारीवरून निलंबित

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : अवैध वाळू वाहतूक व्हावी, यासाठी लाच मागितल्याचा व्हिडीओ पुराव्यासह ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांची जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. 
चिखलठाण या ठिकाणी गुरुवारी (दि.१२ ऑक्टोबर) घर कामासाठी मुळा नदीपात्रातील वाळू भरून चाललेला टेम्पो पोलिस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकाण यांनी पकडला. यावेळी केकाण यांनी टेम्पो मालक भारत नानाभाऊ काळनर यांच्याकडे अवैध वाळू वाहतुकीसाठी हप्ता मागितला. पैसे दिले नाहीत. तर, साहेबांनी गाडी लावायला सांगितली आहे. अशी वरिष्ठांच्या नावाने लाच मागितली. पोलीस खात्याची बदनामी केली. याबाबत १५ मिनिटांच्या व्हिडिओ पुराव्यासह भारत काळनर व जमीर सय्यद या दोघांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज केले.


पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. तक्रारीची प्राथमिक चौकशी केली असता, त्यात,  व्हिडीओ पुराव्यातील संभाषण व साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला. या अहवालानुसार दि. ११ नोव्हेंबरला पोकाॅ केकाण यांचा निलंबनाचा आदेश काढण्यात आला. त्यात "व्हिडीओ क्लिपमध्ये अवैध वाळू वाहतूकीच्या हप्त्याची मागणी करतांना दिसत आहे. पोकाॅ केकाण यांनी बेजबाबदार वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली आहे. चौकशीत हस्तक्षेप व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची संधी प्राप्त होऊ नये. म्हणून त्यांना पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे." "केकाण यांनी जिल्हा मुख्यालयात प्रत्येक शुक्रवारी परेड ग्राउंडवर उपस्थित राहून हजेरी द्यावी. जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे." आदेशात म्हटले आहे. 



Post a Comment

0 Comments