Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासनाने कर्मचा-यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची तात्काळ पुर्तता करावी. अन्य‍था नजीकच्या काळात अनियमित कालावधीसाठी काम बंद आंदोलन केल जाईल - कर्मचारी युनियन जिल्हाध्यक्ष विकास साळुंके

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- दि. 26 रोजी देशपातळीवर व राज्यात देखील कर्मचारी कामगार यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. या आंदोलनास महाराष्ट्रा राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा देखील पाठिंबा आहे. परंतु सद्यस्थितीत देशभर व राज्यात देखील कोविड या साथीच्या‍ महामारीमुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संपात प्रत्यक्ष सहभागी झाली नसली तरी, जिल्हा परिषद कर्मचायांच्या प्रदिर्घ कालावधीपासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती व तालुका स्तसरावरील सर्वच क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचा-यांनी आज काळया फिती लावून काम करून शासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये सर्वच कर्मचा-यांनी उत्सुर्त असा सहभाग घेवून आजचे आंदोलन यशस्वी केले आहे. शासनाने कर्मचा-यांच्या प्रलंबित असलेल्याा मागण्यांची तात्काळ पुर्तता करावी. अन्य‍था नजीकच्या काळात अनियमित कालावधीसाठी काम बंद आंदोलन केल जाणार आहे. असे आवाहन कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके यांनी केले आहे.
जिल्हा परिषद स्तरावरील आजचे आंदोलन सुभाष कराळे, राज्य उपाध्यक्ष एम पी कचरे, राज्य. समन्वायक राजेंद्र म्हस्के, शशिकांत रासकर, सचिन कोतकर, या केंद्रीय कार्यकारणीच्यां संदस्यांच्‍या प्रमुख उपस्थितीत पार पडले आहे. आंदोलनात सर्वच जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी झाले असून मा. मुख्या कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्या्साठी प्रामुख्याने विजय कोरडे, शिवाजी भिटे, किशोर शिंदे, भारत बोरुडे, भारती सांगळे, अभय गट, विजय औटी, सुहास गोबरे, संतोष लंके, संतोष नलगे, सुनिल जाधव, निलेश गायकवाड, सुमित चव्हाण, योगीराज वारुळे, ईम्रान शेख, उमाकांत भांड, सागर भंडारी, अमोल दिवटे, भाऊ कु-हे, कल्पना झोडगे, गणेश पवार, सारंग पठारे, सुभाष म्हस्के, वैशाली खांदाट, नितीन लोळगे, रजनी जाधव, शोभा शिर्के, शिवहरी दराडे, संजय कडूस, चंद्रकात वाकचौरे, शांतीलाल डोबाळ, सचिन आल्हाट, बाळासाहेब गोल्हार, अंजना गाडेकर, विजया नरवडे, संदिप तुळेकर, वैशाली कासार, आरती जाधव, मनिषा सटाणकर यांनी सहभाग होते.Post a Comment

0 Comments