Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोजगार मिळण्यासाठी पिठाच्या गिरण्यांचे वाटप

 


आत्मविश्‍वास वाढून भविष्यात प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज -आमदार संग्राम जगताप
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भामुळे आरोग्याबरोबरच अनेक रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात प्रमुख्याने अनेकांचा रोजगार बुडाला तर नोकर्‍या देखील गेल्या आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत युवक, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 50 टक्के सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 50 टक्के सवलतीच्या दरात कोरियन कंपनीच्या पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अंजली आव्हाड, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, बाळासाहेब जगताप, रमेश शिंदे, महादेव कराळे, गणेश बोरुडे, मनिष फुलडहाळे, अ‍ॅड. योगेश नेमाणे, अनिकेत कोळपकर, संतोष चौधरी, बंटी पोकळे, दिपक खेडकर आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होणार आहे. विशेषत: महिलांसाठी हा उपक्रम फायदेशीर असून, त्यामुळे कुटूंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे. अशा योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नागरिकांनीही अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर प्रत्येकाला नोकरी लागणे शक्य नाही, अशा परिस्थिती छोट-मोठ्या व्यवसाय करुन प्रगती करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळातही गरजूंना मदतीचा मोठा हात देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधार देण्याचे काम केले आहे. असेच काम यापुढेही सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, रेश्मा आठरे आदिंनी मार्गदर्शन करुन शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कंपनीही या मशिनबाबत वॉरंटी, सर्व्हीस सेंटर सुरु करावे अशा सूचना केल्या. प्रास्तविकात संतोष ढाकणे या उपक्रमाचे वैशिष्ट्ये सांगितले. आभार वैभव ढाकणे यांनी मानले. राष्ट्रवादी विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व उपाध्यक्ष संतोष ढाकणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.   Post a Comment

0 Comments