Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भगवानगडाच्या पायथ्याशी महिलेवर बिबट्याचा हल्ला ; अपंग पतीमुळे वाचले प्राण

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी-  भगवानगड पायथ्याशी असलेल्या  लमाण तांडा येथील छ्बुबाई एकनाथ राठोड (वय ४५) यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खरवंडी येथील दीपक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यावेळी अपंग पतीने बिबट्याला दगड मारून  पत्नीला वाचविले असल्याचे सांगितले जात आहे 
याबाबत समजलेली माहिती अशी की, भगवानगड पायथ्याला लमाणतांडावरील छ्बुबाई एकनाथ राठोड या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यावेळी छबुबाई यांच्याबरोबर अपंग पती एकनाथ दासू राठोड हे त्याच्यांबरोबर होते. पत्नीवर बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी दगड उचलत प्रतीकार केला तरी बिबट्याने त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक पंजा मारला आहे. त्यामुळे त्या जखमी झाल्या माहीती मिळताच युवकानी त्यांना खरवंडी कासार येथील दिपक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पिजंरा घेऊन निघाले आहेत.

Post a Comment

0 Comments