Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनोज दुलम यांची निवड म्हणजे त्यांच्या कामाची पावती - श्रीनिवास बोज्जा

 सभागृह नेते मनोज दुलम यांचा फटाका असोसिएशन च्या वतीने सत्कार
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महानगरपालिकेच्या सभागृह नेते पदी नगरसेवक मनोज दुलम यांची निवड झाल्याबद्दल दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी फटाका असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले चांगले काम केले की त्याचे फळ मिळते त्या प्रमाणेच मनोज दुलम यांच्या कामाची नोंद घेऊन एका सामान्य कार्यकर्त्यास सभागृहपदी निवड केलीही भूषणावह गोष्ट आहे. 
यावेळी सत्कारास उत्तर देतांना मनोज दुलम म्हणाले फटाका असोसिएशन जो माझा सत्कार केला हा माझा घरगुती सत्कार असून मी माझ्या पदाचा वापर व्यापारी वर्गाना मदत होण्यासाठी नक्की करेल. नगर शहरात व्यापारी वर्ग हा कमी होत असून व्यापारी वाढण्यासाठी मी अहमदनगर महानगरपालिका माध्यमातून नक्कीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 
या वेळी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते सभागृह नेते मनोज दुलम यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत असोसिएशन चे सचिव संतोष बोरा यांनी केले व आभार सहसचिव अरविंद साठे यांनी केले. यावेळी असोसिएशन चे उपाध्यक्ष सोमा रोकडे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, अनिल टकले, संतोष वल्ली, कैलास खरपुडे, सुनील गांधी, अमोल तोडकर, गणेश परभाने, विकास पटवेकर, दाजी गारकर, संजय सुराणा, शिवराम भगत, उमेश क्षीरसागर, विजय बोज्जा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments