Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या बन्नोमॉ यात्रात्सोव रद्द ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा पंचकमेटीचा निर्णय

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - बोधेगाव येथील हिंदु मुस्लिमांचे ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री साध्वी बन्नोमाँ दर्ग्याचा यात्राउत्सव सालाबादप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या बुधवारी संदलची चादर आर्पण करत यात्राउत्सवास प्रारंभ करतात मात्र यंदा यात्राकाळात होणारी गर्दी आणि कोरोनाचे संकट लक्षात घेता खबरदारी म्हणून बन्नोमाचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय यात्रा पंचकमेटीच्या वतीने घेतला आहे.
श्री साध्वी बन्नोमाँ यात्रौत्सवात बन्नोमांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, सह महाराष्ट्रा बाहेरील देखील काही भाविक दर्शनासाठी येतात यात्रौत्सव दरम्यान लहान मुलासाठी रहाट पाळणे, विविध खेळाचे साहित्य ,
खाऊची दुकाने, महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांच्या कुस्त्या, तसेच तमाशा मंडळ हजेरी लावतात घोडे बाजारात अत्यंत प्रसिद्ध आहे येथे नामवंत जातीचे घोडे पहायला मिळतात खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यात्रेतुन अनेक छोट्या मोठ्या व्यवसाईकाचा धंदा चांगला होउन त्यांच्या संसाराला हातभार लागत आसल्याने याठिकाणी व्यापाऱ्यांची रेलचेल पहायला मिळायची परंतु यंदा कोरोनाच्या महामारीतुन बाहेर पडण्यासाठी आणि सरकारने घालुन दिलेले नियम पाळणे आपले कर्तव्य समजुन हिंदु मुस्लिमांच्या ऐक्याचा यात्राउत्सव यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय यात्रा पंच कमेटीच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान बन्नोमाचा संदल, छबिना, या धार्मिक विधीवत पूजा गर्दी न करता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच याठिकाणी यात्रा काळात कुणी दुकाने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची नोंद घेण्याचे आवाहन यात्रा पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे. 
यावेळी यात्रापंच कमेटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे, उपाध्यक्ष गंगाधर घोरतळे, उपसरपंच नितिन काकडे, ग्रा सदस्य सदानंद गायकवाड, शहादेव गुंजाळ, दिपक गायकवाड, सह यात्रा पंचकमेटीचे सदस्य उपस्थित होते.

संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments