Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक ; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - निंबळक बायपास लामखेडे पंपाजवळ रामदास बन्सी पंडीत (वय 50 रा.निंबळक ता.जि.अहमदनगर ) यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने गळयावर वार खून केला होता. या खून प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मयताचा मुलगा अशोक रामदास पंडित यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं .971 / 2020 भादविक 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार, नगर उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पोलिस पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. अधिक तपास केला असता,
गुन्हा हा विशाल माणिक घायमुक्ते (रा शाहुनगर , केडगाव अहमदनगर) यांने केला असल्याचे निष्पन्न झाले. घायमुक्ते याला ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक केले आहे, अटक आरोपी याने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बोरसे व त्यांना मदतनीस पोना उगलमुगले हे करीत आहेत. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार , नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक एम एम बोरसे , पोहेकों लाळगे, पोना नाकाडे , पोना पांढरकर , पोना चव्हाण , पोना आंधळे , पोना उगलमुगले , पोना दाताळ , पोना शाबीर शेख, पोकॉ वंजारी मोबाईल सेलचे अंमलदार प्रशांत राठोड व नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई इंगळे , पोहेकॉ चव्हाण , पोना दत्ता हिंगडे , पोना संदिप पवार , पोना शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments