Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना संकटकाळात बबन शेळके मित्र मंडळाचा वृद्धांना मदतीचा हात

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी कोरोना रोगामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब वयोवृद्धांना मोतीबिंदू शिबिर आयोजित करून सामाजिक कार्यकर्ते बबनराव शेळके व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांनी दिला मदतीचा हात. बबनराव शेळके मित्र मंडळ आणि बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने २३४ वे मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
शिबिराचा ५५ रुग्णांनी लाभ घेतला. यातील ३३ नेत्र रुग्णांवर कोरोणा टेस्ट करून नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी चिचोंडी पाटील या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले जाईल अशी माहिती आयोजक बबनराव शेळके यांनी दिली.
यावेळी मनियारसर,कैलास पवार, कैलास आठरे, फसले, अशोक जाधव उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी मनीषा कोरडे, मीरा पठारे, भिंगारदिवे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments