Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तारकपूर बसस्थानक येथे दोघांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - येथील तारकपूर बसस्थानक येथे दोघांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.चुन्नीलाल सुभाराम पावरा (वय २१ रा.हिवरखेडा , ता.शिरपूर जि.धुळे), दिलीप जयसिंग पावरा (वय २० रा.अंबा ता.शिरपूर जि.धुळे ) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२६ ला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांना गोपनिय माहीती मिळाली कि, शिरपूर (जि.धुळे) येथून दोन इसम अहमदनगर येथे बेकायदेशीर गावठी कट्टे व काडतूसे विक्री करीता घेवून येणार असल्याची माहीती मिळाली होती. या माहीतीनुसार तारकपूर , अ.नगर येथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आला. थांबलो असता दोन इसम संशयीतरित्या तारकपूर बसस्थानक परिसरात फिरत असताना दिसल्याने सदर दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे चुन्नीलाल सुभाराम पावरा (वय २१ रा.हिवरखेडा , ता.शिरपूर जि.धुळे), दिलीप जयसिंग पावरा (वय २० रा.अंबा ता.शिरपूर जि.धुळे) असे सांगितले. त्याची पंचासमक्ष पोसई गणेश इंगळे यांनी अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ६०,४०० रु . किमतीचे देशी बनावटीचे २ गावठी कट्टे व २ जिवंत काडतूस असा मुददेमाल मिळून आला. तो जागीच जप्त करुन सदरबाबत तोफखाना पो.स्टे . येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई तोफखाना पो.स्टे . हे करीत आहेत. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल दुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे , पोहेकॉ मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, बाळासाहेब मुळीक , पोना सचिन आडबल, विशाल गवांदे , पोकॉ शिवाजी ढाकणे , रणजीत जाधव , चापोहेकॉ संभाजी कोतकर, रविंद्र घुंगासे, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्के आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments