Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोरे डेंटल हॉस्पिटलच्यावतीने कोरोना योध्दयांचा सन्मान कोरोनाकाळात बुद्धीमत्तेचा व माणुसकीचा कस लागला : डॉ संजय पुंड

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : गोरे डेंटल हॉस्पीटलने सकारात्मक दृष्टीकोनातुन सामाजीक बांधलकी जोपासत डॉक्टर्स व विविध सामाजीक संघटनांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. धन्वंतरी श्री विष्णुचा १८ वा अवतार असून आयुर्वेदात धन्वंतरीला विशेष महत्व आहे, असे प्रतिपादन डॉ. संजय पुंड यांनी केले. 
माळीवाडा येथील गोरे डेंटल हॉस्पीटलच्यावतीने कोरोना योद्धयांचा सत्कार डॉ. संजय पुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोरे डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदर्शन गोरे व डॉ. केतन गोरे व कोरोना योद्धे डॉ. सतिश राजुरकर, बूथ हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. महेश कोकाटे,  डॉ. राजेंद्र आव्हाड, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, साईनाथ घोरपडे, नितीन भूतारे, रोहन डागवले, नितीत डागवाले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजूरकर म्हणाले,  आरोग्य व्यवस्थेवर कोरोनाची जबाबदारी होती. ती सक्षमपणे पार पाडत आहे. सर्वजण एकत्र घेऊन आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी मदत केली. समाजात चांगले काम देता येईल ते आरोग्य. समाजात कोरानाची भीती पसरली होती. या वातावरणात जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन धीर देण्याचे काम कोरोना योद्धयांनी केले.
यावेळी श्री कळकुंबे म्हणाले की, कोरोना महामारीचा पहीला रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला त्यावेळी भीतीपोटी माणूस माणसांपासून दूर जात होता. त्यावेळी आम्ही रुग्णांकडून १ रुपयाही न घेता त्यांच्यावर उपचार सुरु केले होते. बूथ हॉस्पिटलला अनेकांनी प्रोत्साहन दिले.
डॉ. अभिजीत शिंदे म्हणाले की, गोरे डेंटल हॉस्पिटलने नेहमीच सामाजीक बांधीलकी जोपासत असतात. कोरानाबाबत कोणतीही माहीती नसतांना आपण सर्वांनी काम केले. आता कोरोना नंतर बऱ्याच रुग्णांना इतर आजार सुरु झाले आहेत. त्यावर उपचार करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. बूथ हॉस्पिटलला मी चांगल्या कामाबद्दल धन्यवाद देतो.
प्रास्ताविकात डॉ सुदर्शन गोरे म्हणाले की, सामाजिक बांधीलकीतुन कोरोना योध्दयांचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा केव्हा कोरोना इतिहासाचा उल्लेख होईल त्या त्या वेळी बूथ हॉस्पिटलच्या नावाचा गौरव होईल. सर्वसामान्य रुग्णांचा विश्वास बूथ हॉस्पिटलने मिळवला आहे. त्यामुळे या सर्व कोरोना योध्दयांचा सत्कार करणे आपले कर्तव्य आहे. उपस्थितांचे आभार डॉ केतन गोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments