Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संत एडमंड चर्च (सी.एन.आय) चा १२५ वा वर्धापन दिन उत्सव साजरा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
नाशिक धर्म प्रांतातील संत एडमंड चर्च (सी.एन.आय)चा वर्धापन दिन धार्मिक उत्साहात सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. संत एडमंड चर्च ची स्थापना २० नोव्हेंबर १८९५ रोजी ब्रिटिश मिशनरी रेव्ह.जे.टेलर यांनी सलाबतपूर या ठिकाणी केली. त्याची पुनर्बांधणी २००५ रोजी करण्यात आली. सालाबात प्रमाणे याही वर्षी चर्च चा वर्धापन दिन कोरोनाचे संकट असताना सुध्दा सर्व नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आला. 
या चर्च च्या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावचे रहिवाशी असणारे परंतु सध्या मुंबई-पुणे या ठिकाणी नोकरी निमित्त स्थायिक झालेले सर्व लोक या दिवशी कार्यक्रमाला येत असतात व कार्यक्रमाला आर्थिक हातभार लावत असतात. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे फार कोणी आले नाही. १९ नोव्हेंबर रोजी पूर्वसंध्या असल्यामुळे सायंकाळी ७ वा. रेव्ह.संजय पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून महिलामंडळ व तरुण संघाने मिरवणूक काढली. या सणाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण चर्च उपासने नंतर करण्यात आले. या वेळी प्रीति भोजन व रात्री भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. मुख्य चर्च उपासनेला सुरवात झाली. यावेळी रेव्ह. संजय पाटोळे यांनी आपल्या संदेशामध्ये चर्च चा इतिहास व जीवनामधील चर्च चे महत्व याबद्दल संदेश दिला. जीवनामध्ये यशस्वी व निरोगी राहायचे असेल व संस्कारक्षम समाज निर्माण करायचा असेल तर चर्च ला नियमित आले पाहिजे. कारण चर्च मध्ये केलेली प्राथर्ना परमेश्वर ऐकत असतो असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या महामारी मध्ये सर्वानी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. तोंडाला मास्क बांधा व सर्व संकटामध्ये प्रभू येशूने सांगितल्या प्रमाणे प्रार्थनेत राहा असे त्यांनी सांगितले. यावेळी पवित्र पभुभोजन विधी झाला. त्यानंतर १२५ वा वर्धापन दिनानिमित्ताने केक कापला व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्ह संजय पाटोळे पाळक साहेब यांनी मार्गदर्शन केले व बनसोडे परिवार,हिवाळे परिवार, साळवे परिवार, गायकवाड परिवार, ताकवणे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments