Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मागासवर्गीयांच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या अशा लोकांचा निषेध : प्रकाश आंबेडकर

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाटणा: मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. आरक्षणातंर्गत महाराष्ट्र सरकारने किती पदे भरली, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. मात्र, राज्य सरकार ही माहिती द्यायला तयार नाही. मागासवर्गीयांच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या अशा लोकांचा आम्ही निषेध करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 
प्रकाश आंबेडकर सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून गंभीर आरोप केले. महाराष्ट्र शासन मागासवर्गीयांना फसवत आहे. सुप्रीम कोर्टात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबद्दल मागितलेली माहिती तयार असूनही दिली जात नाही. आता सरकारने समिती वगैरे स्थापन करणे हा श्रीमंत मराठ्यांचा मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध डाव असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने एका समितीचे गठन केले असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात माहिती घेणार आहे. हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळू नये, यासाठी काही श्रीमंत मराठ्यांचा एक गट कार्यरत आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सर्व मागासवर्गीय अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात आंदोलन सुरु करावे, असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.
यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको असल्याचे वक्तव्यही केले होते. महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

Post a Comment

0 Comments