Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एच.आय.व्ही.रुग्णांसाठी मोफत ‘व्हायरल लोड’चाचणीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - एच.आय.व्ही.सह जगणार्‍या व्यक्तींच्या उपचारासाठी त्यांच्या शरीरातील एच.आय.व्ही. विषाणूंचे प्रमाण तपासणीसाठी व्हायरल लोड (डी.बी.एस.) ही चाचणी करावी लागते. दि. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त ही चाचणी नगरच्या विहान काळजी व आधार केंद्रात मोफत केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे खजिनदार प्रशांत येंडे यांनी दिली.
पुणे येथे नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल्स लिव्हिंग विथ एच.आय.व्ही. या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या ताल प्लस एकात्मिक आरोग्य केंद्र व कम्युनिटी फार्मशी चालविली जाते. ज्यामध्ये एच.आय.व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना औषधामध्ये 30 ते 70% पर्यंत सवलत उपलब्ध करून दिली जाते जे रुग्ण वेळचे वेळी खाजगी डॉक्टरांकडून व ताल कॉम्युनिटी फार्मासि मधून दर महिन्याला औषधे घेतात अशा रुग्णानांसाठीच viral लोड तपासणी हि मोफत होणार आहे एच आय व्ही ची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरातील विषाणूची पातळी समजून त्यावर उपचार करावे लागतात. ‘व्हायरल लोड’ तपासणी करण्यासाठी खाजगी लॅब मध्ये सुमारे 4 हजार रुपये पर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे पुणे येथील नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल्स लिव्हिंग एच.आय.व्ही. या संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. 
अहमदनगर जिल्ह्यातील एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या रुग्णांनी विहान काळजी व आधार केंद्र , मिरा चंद्रा अपार्टमेंट, झोपडी कॅन्टिंग हॉटेलसमोर, सावेडी या ठिकाणी सकाळी 11 ते 4 यावेळेत ज्या व्यक्ती खाजगी डॉक्टरांकडून किंवा ताल फार्मसी मधून औषधे घेतात, अशा व्यक्तींनीच या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन एन.एम पी .+ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments