Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय समित्यां रखडल्या ; जिल्ह्यात पालकमंत्र्यांवर नाराजीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / बाबा ढाकणे 
अहमदनगर - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष उलटले. परंतु जिल्ह्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अथवा सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने ज्या 10 जिल्हास्तरीय व प्रत्येक तालुक्यात 8 तालुकास्तरीय समित्या प्राधान्याने नियुक्त होणे क्रमप्राप्त होते. परंतु केवळ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दुर्लक्षामुळे या सर्व समित्या अद्यापपर्यंत नियुक्त झालेल्या नाहीत. या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या विषयी नाराजी पसरली असून, पालकमंत्री हे सरकार गेल्यावर या सर्व समित्या स्थापन करणार का ?, असे उपरोक्त बोलले जात आहे.


अहमदनगर जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या शिफारसीने अशासकीय सदस्यांची जिल्हास्तरीय समित्यांमध्ये नियुक्ती होत असते. समित्या याप्रमाणे संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय ग्राम स्वच्छता अभियान समिती, स्वातंत्र्यसैनिक गौरव समिती, जिल्हा पाणीपुरवठा योजना आढावा समिती, अपंग व्यक्ती पुनर्वसन समिती, जिल्हा हुतात्मा स्मारक समिती, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रम समिती, मागास मुला-मुलींकरिता शासकीय तसेच अनुदानित वस्तीग्रह निरीक्षण समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समिती, वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती, रोजगार हमी योजना समिती आदि 10 समित्यांसह तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समिती, तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवरील दक्षता समिती, तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समिती, तालुका अवैद्य दारू प्रतिबंधक घालण्यासाठी समिती, तालुकास्तरीय शिक्षण सल्लागार समिती, तालुकास्तरीय विद्युत वितरण निमंत्रण समिती, तालुका दुष्काळ निवारण समिती आदी 8 समिती स्थापन होणे क्रमप्राप्त आहेत. परंतु या सर्व समित्या केवळ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दुर्लक्षतेमुळे रखडले आहेत. यामुळे आता या समित्या केव्हा स्थापन होतात. याकडे सर्व जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments