Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनील कटके यांची अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

  


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनील कटके यांची अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे,
अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची नुकतीच बदली झाली होती, ही जागा रिक्त होती. या अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष होते. अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी आपली वर्णी लागावी म्हणून अनेक जण प्रतीक्षेत होते. मात्र आज शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनिल कटके यांची स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत विविध पो.नि.ची नावे चर्चिला जात होती, त्यावर आता पूर्णविराम बसला आहे. 
अनिल कटके यांची स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन होत आहे, ते कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची अहमदनगर तानी गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

Post a Comment

0 Comments