Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - गेल्या आठवडाभरापासून पाथर्डी शेवगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या गुरुवारी पहाटे अलगद आष्टी वनपरिक्षेत्राच्या सावरगाव हद्दीत जेरबंद झाला. 
तिसगाव पाथर्डी वनविभाग परिसरामध्ये धुमाकूळ घालून याठिकाणी तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. यामुळे संपूर्ण तालुका भयभीत झाला होता. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके नेमण्यात आली होती. शिरापूरच्या डोंगराच्या वरच्या बाजूला सावरगाव वनविभागाच्या हद्द आहे. या बिबट्याचा वावर आहे हा शिरापूर, कराडवाडी, सावरगाव असा होता.


Post a Comment

0 Comments