Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार कॅन्टोन्मेंट टोल नाका प्रकरणीतील आणखी दोन आरोपी काही तासात अटक ; नगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - सोलापूर रोडवरील छावणी परिषदेच्या वाहन प्रवेशकर टोल नाक्यावरील कर्मचारी यांना हप्ता मागत जीवे मारण्याची धमकी देऊन कॅन्टोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून  काही अवघ्या तासाच्या आत शहर पोलिस उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने शनिवारी (दि.21) दुपारी आणखी दोघा आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. संदीप वाकचौरे, प्रकाश भिंगारदिवे अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
भिंगार कॅन्टोन्मेंट टोलनाका लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ही शुक्रवारी रात्री ९:३० च्या दरम्यान घडली होती. या घटनेतील सराईत गुन्हेगार संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड, भागवत चाळ, नगर) यास लगेच रात्रीच भिंगार कँप पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संदीप वाकचौरे, प्रकाश भिंगारदिवे या दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून काही अवघ्या तासाच्या आत शहर पोलिस उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने शनिवारी (दि.21) दुपारी आणखी दोघा आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. उर्वरित आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव. (रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) ही दोघे फरार असून त्याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या सूचनेनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि प्रविण पाटील यांच्या पथकातील एपीआय सुरसे, पीएसआय देशमुख, शिंदे, पोना राजेंद्र सुद्रीक, पोकाॅ द्वारके, समीर शेख आदिसह अन्य पोलिस कर्मचा-यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments