Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावच्या पारावर "झरा जाणिवांचा" काव्यसंग्रहाचे विवेचनासह लोकार्पण

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - नागलवाडीचे सुपूत्र संजय आंधळे उर्फ कवी सुभद्रासुत यांच्या नुकत्याच अ.नगर केडगाव येथे प्रकाशीत झालेल्या सामाजिक ग्रामीण व शहरी विविध विषयावरील दिनविशेष असणार्‍या "झरा जाणिवांचा"या ह्रदय द्रावक काव्य संग्रहाचे गिते महाराज भगवानगड, ज्येष्ठ वाचक-बाबुराव पं.ढाकणे, संजय आंधळे, बाबासाहेब नागरे महाराज, पै.जाधव यांच्या उपस्थितीत कवी सुभद्रासुत आंधळे व कवी लक्ष्मण खेडकर यांच्या शब्दातून अनेक कवितांचे विवेचन गावच्या पारावर करण्यात आले.हा काव्यसंग्रह गावकर्‍यांसमोर प्रत्यक्षात उलगडून दाखवला. 


यावेळी मान्यवर व तरुणांनी पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केले. पुस्तकांच्या प्रती गावातील ३ अंगणवाडी, १आशासेविका, ३ तरुण मित्रमंडळे, ग्रामपंचायत, जि.प. प्रा.शाळा यांना भेट देण्यात आल्या. यावेळी गावातील बहुतांश बाल, तरुण, जेष्ठ नागरिक ,महीला मंडळ सर्वच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास ढाकणे व आभार रामेश्वेर ढाकणे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments