Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रोज दह्यात गूळ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्यास फायदा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल. जाणून घेऊयात दह्यांमध्ये गूळ मिसळून खाल्ल्याचे फायदे
१) शरिरातील रक्ताची समस्या होईल दूर
शरिरात रक्त कमी असल्याच्या तक्रारी अनेकजण करतात. त्यावर अनेक उपायही केले जातात. पण दही आणि गुळ या घरगुती उपायानं ही समस्या दूर होईल. शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे असल्यास दह्यामध्ये गुळ मिसळून दररोज खावा.
२) सर्दी-खोकला होईल दूर
पावसाळा सुरु झाल्यावर किंवा दररोजच्या पाण्यात बदल झाल्यास अनेकांना सर्दी अन् खोकला होतोच. गुळामध्ये असलेल्या मिनरल्स, लोहा, मॅग्नीशियम, पोटेशियम, कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज आणि कॉपरसारख्या तत्वामुळे अनेक आजार नाहिशे होतात. सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर दही आणि गुळाच्या मिश्रणात काळी मिर्ची पावडर टाकून मिश्रण करा. हे सेवन केल्यास सर्दी अन् खोकला नाहिसा होईल.
३) पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत
गुळामध्ये असलेल्या पोषणतत्वामुळे पचन प्रक्रियेसंदर्भातील आजार सुधारण्यास मदत होते. गुळामुळे पचन प्रक्रिया सुलभरित्या होते व पोटामध्ये गॅस निर्माण होत नाहीत. विशेषकरुन हिवाळ्याच्या दिवसांत होणा-या पोटाच्या समस्या गुळ व दह्यानं कमी होतात. दररोज दही आणि गुळाचं सेवन केल्यास पोटाचे विकार दूर होतील.
४) मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत
मासिक पाळीदरम्यान येणारे क्रेम्प्स आणि वेदना दही आणि गुळाच्या सेवनामुळे कमी होतात. आतापर्यंत तुम्ही याचं सेवन केलं नसेल तर आजच सेवन करायला सुरुवात करा…दही आणि गुळ खाण्याचे फायदे तुम्हाला मिळतील.
५) वजन घटवण्यास मदत
मधाप्रमाणेच गुळही आपल्या आरोग्यास फायदेशीर आहे. कारण गुळ रासायनिक प्रक्रियांविना तयार केला जातो. यामुळे गुळ साखरेहून अधिक शरीरास पोषक आहे. यामुळेच दररोज धह्यासोबत गुळाचे सेवन करावे.
दह्य़ाचे दुष्परिणाम-
मधुर व मधुर आंबट असे ताजे दही खाल्ले तर शरीरास बाधत नाही. परंतु शिळे, अतिआंबट, रात्रीच्या वेळी खाल्ले तर अनेक आजारांना आमंत्रण मिळते. दह्य़ामुळे श्वसनमार्गाचे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. उदा. दमा, खोकला, सर्दी, पडसे, फ्ल्यू, आम्लपित्त या काळामध्ये शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते व अतिआंबट दह्य़ामुळे ती अजूनच कमी होते. म्हणून थंड, आंबट व बाहेरचे दही या ऋतूमध्ये खाऊ नये. दही खायचेच असेल तर मधुर ताजे दही दुपारच्या वेळात खावे किंवा दह्य़ाचे ताक करून प्यावे.
दही बनविण्याची प्रक्रिया-
दही बनविताना साधारणत अर्धा लिटर दुधामध्ये १ मोठा चमचा विरजण घालावे. ते विरजण ताज्या दह्य़ाचे असावे. विरजणावरच दह्य़ाचा स्वाद अवलंबून असतो. जर विरजण मधुर आंबट असेल तर होणाऱ्या दह्य़ाची चवही आंबट-गोड असते व याचा सुगंधही चांगला असतो. सहसा नेहमी ताजे दही आहारात वापरावे, म्हणजे ते आरोग्याला बाधत नाही. उन्हाळ्यामध्ये दही पटकन तयार होते, तर थंडीमध्ये दही तयार होण्यास उशीर लागतो. उन्हाळ्यात सात ते आठ तासांमध्ये दही लागते तर हिवाळ्यात १४-१५ तास लागतात. अशा प्रकारे ताजे दही आहारात वापरावे. फ्रीजमध्ये ठेवून किंवा अति आंबवून आंबट झालेले व थंड असे दही आहारात वापरू नये.
Post a Comment

0 Comments