Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड जिल्ह्यात युवतींच्या अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून जाळण्याच्या घटनेचा तीव्र निषेध असून, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे : मानवाधिकार अभियान प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : - बीड जिल्ह्यात येलंब घाट" या गावातील ठिकाणी युवतींवर पेट्रोल व ॲसिड टाकून पेटवून देण्याची मानव जातीला काळीमा फासणारी अमानवी कृत्याची घटनेचा मानवाधिकार अभियानच्यावतीने तीव्र निषेध केला असून, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मानवाधिकार अभियान प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील "येलंब घाट" या गावातील ठिकाणी युवतींवर पेट्रोल व ॲसिड टाकून पेटवून देण्याची मानव जातीला काळीमा फासणारी अमानवी कृत्याची घटना शनिवार दि. १४ रोजी घडली. ती युवती यातनांनी विव्हळत १० ते १२ तास पडून होती. मात्र तिच्या मदतीकरीता एकही स्री अथवा पुरुष व्यक्ती लवकर धावुन आला नाही. मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना असून या प्रकरणी नराधम गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी. महिलांवरील वाढते अन्याय अत्याचार ही देशासह महाराष्ट्रात चिंतेची बाब झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ने त्वरित कठोर पाऊले उचलावीत व या निंदनीय घटनेचा मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष सौ. संध्याताई मेढे यांनी निषेध केला आहे. 
नुकतीच हैदराबाद व उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना ताजी असतानाही महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये अलिकडे मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन तरुणी, युवती, महिलांवरील राज्यातील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकाराने कठोर पाऊले उचलावीत. महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने राज्यात ही चिंतेची बाब ठरली असून या प्रकरणी राज्य सरकार ने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी मानवाधिकार अभियानच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आली.

Post a Comment

0 Comments