Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुण्यात स्वारगेट पोलिसांनी केला मोठा शस्त्रसाठा जप्त

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पुणे :   'खूनाचा प्रयत्न' या गुन्ह्यात फरार असणारा आरोपीस पोलीसांनी जेरबंद करताच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्वारगेट पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी तब्बल 11 पिस्तूल आणि 31 जिवंत काडतुसे असा एकूण 4 लाख 55 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती प्रभारी सह आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर आणि झोन-2 चे उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बारक्या उर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (19, ह.मु. क्विन्स् रेसिडेन्सी शेजारी, जिजामाता चौक, आंबेगाव पठार, पुणे), राजु अशोक जाधव (20, रा. माणगाव, ता. हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (49, रा. निमखेडी, जि. बुलढाणा), लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी (24, रा. टेल्को कॉलनी, कात्रज), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रभारी सह आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर आयुक्त संजय शिंदे, झोन-2 चे उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, तपास पथकाचे उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरूण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश कांटे, भुषण उंडे, बाबासाहेब शिंदे आणि शंकर गायकवाड यांच्या पथकाने अटक केली.


Post a Comment

0 Comments