Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रविवार दिवसभरात बिबट्याचा दुसरा हल्ला ; पारगावात महिला जागीच ठार

 


नरभक्षक बिबट्याला ठार 
मारण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
आष्टी - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव येथे पुन्हा दुसरी महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवार सायंकाळी घडली. असे असतानाही विशेषतः वनविभागाकडून ठोस अशी उपाययोजना केली जात नाही. यामुळे नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची मागणी पाथर्डी (जि.अहमदनगर) व आष्टी (जि.बीड) तालुक्यातून केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेतातून सुरेखा नीलकंठ भोसले हीला घरी येण्यास उशीर झाल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोधाशोध सुरू केली होती. यावेळी घटना उघडकीस आली. यावेळी सुरेखा ही महिला बिबट्याचा हल्ला जागीच ठार झाली. या दरम्यान, सुरेखाचा पती हा बिबट्याचा पाठलाग करताना बेशुद्ध पडला होता. ही भयानक घटना दिवसभरातील दुसरी घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरातील नागरिक बिबट्याच्या हल्ल्याने चांगलेच भयभीत झाले आहेत. या नरभक्षक बिबट्या तातडीने बंदोबस्त करा अन्यथा ग्रामस्थांनाच बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या, अशी संतप्त नागरिकांनी केली आहे.Post a Comment

0 Comments