Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राञी शेतात पिकास पाणी देणा-या महिलेवर बिबट्याचा हल्ला ; महिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - शिरपूर तालुक्यातील जाडवड या परिसरात शेतामध्ये पिकाला पाणी देत असताना एका महिले वर बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चिंचपुर पांगुळ पासून तीन किमी अंतरावर असलेल्या परिसरातील जाटवड ता .शिरूर (का) येथील शेतात विजेची रात्र पाळी असलेने अलका राजेंद्र बडे (वय३९) व त्यांचा मुलगा मच्छिन्द्र बडे हे पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने अलका यांच्यावर हल्ला केला . त्याचा आरडा ओरडा ऐकून जवळील त्यांचा मुलगा व गावातील लोक मदतीसाठी आल्याने पुढील अनर्थ टळला आणि तुरीच्या पिकात बिबट्याने धूम ठोकली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. अंगावर थँडीपासून बचाव करण्यासाठी घोंगडी पांघरली असल्यामुळे बिबट्याची पकड सैल झाल्यामुळे अलका यांना आपली सुटका करून घेता आली यामध्ये त्यांच्या गालावर ,कान, पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सदर महिलेवर शिरूर कासार येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संकलन - सोमराज बडे


Post a Comment

0 Comments